नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.
दोन्ही राज्यांमधील लोकांना आपला नवा मुख्यमंत्री कोण असेल याची उत्सूकता लागून आहे. यूपीमध्ये मुख्यमंत्रीचा निर्णय १८ मार्चपर्यंत होणार आहे. पक्षाने १८ मार्चला उत्तरप्रदेशमध्ये विजय दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये बूथ स्तरावर विजय साजरा केला जाणार आहे. सगळे आमदार, खासदार आणि पदाधिकारी या विजय उत्सावात भाग घेणार आहे.