तरूणीच्या मृत्यूनंतर बॉलिवूडकरांचा ट्विटरवर टाहो

दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार, आणि त्यानंतर तरूणी झालेली मारहाण यानंतर तब्बल १३ दिवस तरूणीने मृत्यूशी दिलेली अपयशी झुंज.

Updated: Dec 29, 2012, 07:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार, आणि त्यानंतर तरूणी झालेली मारहाण यानंतर तब्बल १३ दिवस तरूणीने मृत्यूशी दिलेली अपयशी झुंज.. या साऱ्या प्रकराने देश चांगलाच ढवळून निघाला. तरूणीच्या निधनानंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. सोशल वेबसाईटवरच्या विविध स्तरांतील, विविध क्षेत्रातील प्रतिक्रियांमधून राग आणि संताप दिसून येतोय.
शशी थरूर
आपल्या शूर बहिणीच्या मृत्यूनं अतीव दु:ख झाले आहे, या तरुणीचा लढा विसरता येणार नाही.
शबाना आझमी
आपला अंतरआत्मा केंव्हा जागा होणार?
महेश भट्ट
महिलांनो शांतता तुमची सुरक्षा करू शकत नाही, बोला नाही तर कायमचे शांत व्हाल.
अर्जुन रामपाल
तिच्या मृत्युमुळे आपल्या देशाची मान शरमेने झुकली आहे, खरंच मला आशा आहे की तिच्या आत्म्याला शांती मिळेल.
अनुपम खेर
हा मनुष्याच्या प्रतिष्ठेचा मृत्यू आहे, एका भारतीयाचा मृत्यू आहे निष्पाप जीवाचा हा मृत्यू आहे. आणि हा यंत्रणेचा मृत्यू आहे, भारतीयांच्या ह्रदयावर आघात झालाय तिच्या आत्म्यास शांती लाभो.
बिपाशा बासू
धैर्य खचलंय आणि अस्वस्थ झाली आहे, त्या धैर्यशाली मुलीच्या आत्म्यास शांती लाभो.
शबाना आझमी
तू हकीकत भी है दिलचस्प कहानी नही, तेरी हस्ती भी एक चीज जवानी ही नही, अपनी तरीक का उनवान बदलना है तुझे, उठ मेरी जान....
प्रितीश नंदी
मला तिचं नाव माहित नाही, मला तिचा धर्मही माहित नाही, मला एवढंच माहिती आहे, तिच्या मृत्युला आपण जबाबदार आहोत, ते सहा लोकं नाही. आपण फक्त घरी बसून बघत राहतो, बदलासाठी काहीही करत नाही. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.
नरेंद्र मोदी
भारताच्या धैर्यशाली मुलीच्या मृत्युची बातमी ऐकून मी अतिशय दु:खी आणि अस्वस्थ झालो आहे. तिच्या कुटुंबासह माझी सहानूभुती आहे.
शोभा डे
भारताच्या रणरागिणीच्या आत्म्याला शांती लाभो.
रितेश देशमुख
धाडसी मुलीचा मृत्यु झाल्याचं समजलं, ती खरोखर लढवय्यी होती, हे दु:खद आहे. आपण जागे होण्याची वेळ आली आहे.

फराह खान
क्रांती घरातून घडायला हवी, आपल्या मुलांना स्त्रियांचा आदर करायला शिकवूयात.
सोनी राझदान
सरकारनं निदान तिचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये, बदल घडवण्यासाठी सरकारनं आता काही करी करावं.
अजय देवगण
बलिदानाशिवाय क्रांती घडूच शकत नाही का? , मला आशा वाटते तिचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.
अभिषेक बच्चन
मला भारतीय असल्याचा नेहमीच अभिमान होता, पण आज आपल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे, निष्पापाचा बळी गेल्यावरच देश खडबडून जागा होणार का?
बोमन इराणी
ती एक क्रांतिकारी होती, तिच्या या बलिदानाचा विसर पडता कामा नये.
स्वानंद किरकिरे
ऐसी काली सुबह ना लौंटे, ये शर्म से भरा आज..
कुछ बदले मेरे भीतर, मैं खुद को बदल दूं आज...
मंदिरा बेदी
ज्या नराधमांनी हे कृत्य केलंय ते आपल्याला वाकुल्या दाखवत आहेत,
"कितीही आंदोलनं करा आमचं काही होणार नाही."
महेश भूपती
तिच्या अशा जाण्याने, आत्म्याला शांती मिळो म्हणण्यात काही अर्थ नाही, आपल्या राज्यकर्त्यांनी या घटनेतून धडा घ्यायला हवा, तरच तिच्या आत्म्याला शांती लाभेल.