BSFचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, १४ पोस्ट केल्या उद्धवस्त

भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या 14 चौक्यांवर बीएसएफने आज जोरदार प्रहार केला. पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर भारतावर गोळीबार केला जात आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत बीएसएफने केलेल्या फायरींगमध्ये पाकिस्तानच्या 14 पोस्ट उध्वस्त झाल्या. 

Updated: Nov 1, 2016, 07:50 PM IST
BSFचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, १४ पोस्ट केल्या उद्धवस्त title=

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या 14 चौक्यांवर बीएसएफने आज जोरदार प्रहार केला. पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर भारतावर गोळीबार केला जात आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत बीएसएफने केलेल्या फायरींगमध्ये पाकिस्तानच्या 14 पोस्ट उध्वस्त झाल्या. 

पाकिस्तानकडून पहाटेपासून जम्मू काश्मीरमधील सांबामधल्या रामगढ, राजौरी, अरनियामध्ये गोळीबार केला जात आहे. त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी बीएसएफने पाकिस्तानवर जोरदार भडीमार केला. त्यात 14 चौक्या उध्वस्त झाल्या आहेत. 
 
 पाकिस्तानच्या गोळीबारात एका 19 वर्षीय तरूणीसह ८ जणांचा मृत्यू झालाय. यात रामगढ सेक्टरमधील 19 वर्षीय तरुणी आणि राजौरीतील पानीयारीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.