कामगार नेते मिलिंद तुळसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

कामगार नेते मिलिंद तुळसकर यांनी आज जाहीरपणे भाजपात प्रवेश केलाय. 

Updated: Nov 1, 2016, 06:07 PM IST
कामगार नेते मिलिंद तुळसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश title=
सौ. ट्विटर

मुंबई : कामगार नेते मिलिंद तुळसकर यांनी आज जाहीरपणे भाजपात प्रवेश केलाय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत तुळसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी, सुनिल राणे, कमलाकर दळवी हेदेखील उपस्थितीत होते. 

तुळसकर यांनी भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीस आणि संयुक्त चिटणीस पदावर काही वर्षे काम केलंय. शिवाय, कोकण रेल्वे कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. धारावी बचाव संघर्ष समितीचे सरचिटणीस म्हणूनही ते कार्यरत आहेत. 

त्यांनी जवळपास 19 वर्ष नॅशनल रेल्वे मजदूर युनियनमध्ये आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघात एक वर्ष असा तब्बल 20 वर्षे सहाय्यक महामंत्री म्हणून काम पाहिलंय. 

रेल्वेमध्ये महाराष्ट्र एकता अभियानाच्या माध्यमातून कामगारांचे संघटन बांधून आहेत कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेचे अध्यक्ष पदही त्यांच्याकडे आहे. चिड्रन्स एड्स सोसायटी कर्मचारी संघटना, महात्मा गांधी हास्पिटल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. ऑल इंडिया एव्हिएशन फेडरेशनचे सरचिटणीस म्हणूनही ते कार्यरत आहेत