बीएसएफ जवान तेजबहादूर यांना सेवेतून केले बडतर्फ

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन बीएसएफ जवानांना खराब जेवण देण्यात येत असल्याची तक्रार दाखल करणारे जवान तेजबहादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेय.

Updated: Apr 19, 2017, 04:27 PM IST
बीएसएफ जवान तेजबहादूर यांना सेवेतून केले बडतर्फ title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन बीएसएफ जवानांना खराब जेवण देण्यात येत असल्याची तक्रार दाखल करणारे जवान तेजबहादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेय.

तेजबहादूर यादव यांनी खोटी तक्रार करत प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचे बीएसएफने स्पष्ट केलंय. त्यामुळेच त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेय. जवानांकडे याबाबतची चौकशी केली असता खराब जेवणाबाबत कोणीही तक्रार केलेली नसल्याचे समोर आलेय.

काही दिवसांपूर्वी तेजबहादूर यादव यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात त्यांनी जवानांना किती निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते हे दाखवले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तपासाचे आदेश दिले होते.