Video_ दिल्लीत सुपरकिंग विमान असे कोसळले

येथील द्वारका येथून उड्डान करताना बीएसएफचे सुपरकिंग विमान कोसळले. त्यातील दहा जवानांचे अपघाती निधन झाले. याचा व्हिडिओ हाती लागलाय.

Updated: Dec 22, 2015, 08:29 PM IST
Video_ दिल्लीत सुपरकिंग विमान असे कोसळले title=

नवी दिल्ली : येथील द्वारका येथून उड्डान करताना बीएसएफचे सुपरकिंग विमान कोसळले. त्यातील दहा जवानांचे अपघाती निधन झाले. याचा व्हिडिओ हाती लागलाय.

व्हि़डिओ पाहण्यासाठी बातमीच्या खाली जा

दहा जवानांना घेऊन हे विमान रांची येथे निघाले होते. विमान दुरूस्तीसाठी रांचीकडे निघाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी घटनास्थळाला भेट दिली तर नागरी उड्डाण मंत्री महेश शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा विमानाच्या दर्जासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

अखेरची ५ मिनीटे
- सुपरकिंग विमानातून १० जवान रांचीकडे निघाले
- हेलिकॉप्टर दुरूस्त करण्याचा दौरा
- यात डिप्टी कमांडर आणि ७ वरिष्ठ इंजिनिअर होते
- सुपरकिंग विमानाने ९.४५ वाजता हवेत झेप घेतली.
- हवेत जाताच विमानाचे डावी-उजवी बाजूकडे हेलकावे सुरू झाले
- पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले
- पायलटने तिसऱ्या मिनिटाला एअर ट्रॅफीक कंट्रोलशी संपर्क साधून माहिती दिली
- एटीएसने १० क्रमांकाच्या रनवेवर लँडींग करण्यास सांगितले
- नागरिकांचा जीव जाईल म्हणून पाण्यात विमान नेण्याची परवानगी पायलटने मागितली
- मात्र, वेळ कमी होता 
- पायलटच्या नियंत्रणाबाहेर विमान गेले
- १० क्रमांकाच्या रनवेवर लँड़ींग करताना विमान भिंतीवर आपटले
- पाचव्या मिनिटाला अपघात झाला
- द्वारका येथील सेक्टर ८ शहाबाद गाव सुपरकिंग कोसळले
- पायलट शिवनारायण आणि को पायलट भगवती यांच्यासह १० जणांचा मृत्यू झाला

सुपरकिंग विमानाविषयी माहिती...
- ११ जणांना विमानात बसण्याची जागा
- ४९० किलोमीटर प्रति तास वेगाने धावते
- २४०० किलोमीटरचे उड्डान एकाच वेळी घेऊ शकते
- ३० ते ३५ हजार फूट उंचीवरून विमान उडू शकते
- १९८२ मध्ये बीएसएफ एअरविंगला विमान मिळाले
- १९८७ मध्ये दुसरे विमान 
- १९९४ मध्ये तिसरे विमान मिळाले
- अपघात झालेले विमान १९८२ मधील आहे
- या विमानाचा वापर व्हीआयपी मुव्हमेंटसाठी केला जातो.

 

VIDEO: दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचे विमान कोसळले. याचा व्हिडिओ स्थानीय दुकानदार राजकिशोर यांनी दिलाय.

Posted by BBC Hindi on Tuesday, 22 December 2015