पाकच्या कुरापती वाढल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याआधी पाकच्या कुरापती पुन्हा वाढल्यात. याच पार्श्वभुमीवर गृहमंत्री राजनाथ सिंग परदेश मंत्री सुषमा स्वराज सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि NSA अजित दोवल यांनी चर्चा केली.

Updated: Jul 16, 2015, 11:25 PM IST
पाकच्या कुरापती वाढल्या title=

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याआधी पाकच्या कुरापती पुन्हा वाढल्यात. याच पार्श्वभुमीवर गृहमंत्री राजनाथ सिंग परदेश मंत्री सुषमा स्वराज सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि NSA अजित दोवल यांनी चर्चा केली.

भारताला सीमेवर स्थिरता हवीय पण गोळीबारीचं उत्तर गोळीबारीनच दिलं जाईल असं बैठकीनंतर परदेश सचिव एस जयशंकर यांनी सांगितलं.

 दरम्यान जम्मूच्या आर एस पुरा सेक्टरमध्ये काल मध्यरात्री सव्वा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत पाकच्या बाजूनं सातत्यानं जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 4 जण जखमी झालेत.

 सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून आतापर्यंत पाकनं नऊ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. त्यात दोन जवान आणि चार नागरिक जखमी झालेत.

गेल्याच आठवड्यात पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियात बैठक झाली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.