स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएलची जबरदस्त ऑफर

15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएल लँडलाईन ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आलं आहे.

Updated: Aug 13, 2016, 09:33 AM IST
स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएलची जबरदस्त ऑफर  title=

मुंबई : 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएल लँडलाईन ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आलं आहे. बीएसएनएलच्या ग्राहकांना आता प्रत्येक रविवारी कोणत्याही नेटवर्कचा मोबाईल आणि लँडलाईनवर फुकट अनलिमिटेड कॉल करता येणार आहे. 

लँडलाईनचा व्यवसाय वाढवण्यासाठी बीएसएनएलनं हे पाऊल उचललं आहे. याआधी बीएसएनएलच्या ऑफरमध्ये रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अनलिमिटेड फुकट कॉल करता येत होते.

बीएसएनएलमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूरसंचार मंत्रालय रविवारी या योजनेची घोषणा करणार आहे. एवढच नाही तर 15 ऑगस्टपासून 90 दिवसांसाठी बीएसएनएल लँडलाईनचं नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना या ऑफरसाठी महिना 49 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. तसंच नव्या कनेक्शनसाठी घेण्यात येणारे 500 रुपयांचे इन्स्टॉलेशन चार्जही आता भरावे लागणार नाहीत.