देशात रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत राहणार!

देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत अशीच कायम राहील, असे भाकित भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. इको रॅप नावाच्या स्टेट बँकेच्या नियतकालीकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.  

Updated: Dec 20, 2016, 11:09 AM IST
देशात रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत राहणार! title=

नवी दिल्ली : देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत अशीच कायम राहील, असे भाकित भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. इको रॅप नावाच्या स्टेट बँकेच्या नियतकालीकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.  

डिसेंबर अखेर रद्द झालेल्या जुन्या नोटांच्या किमती पैकी पन्नास टक्के किमतीच्या नोटा बाजारात येतील. तर जानेवारी अखेर रद्द झालेल्या नोटांच्या किमतीपैकी 75 टक्के किमतीच्या नव्या नोटा चलनात असतील. फेब्रुवारी अखेरीस 78 ते 88 टक्के नव्या नोटा चलनात आलेल्या असतील, असे सांगण्यात आहे.
 
नोटा बंदीचा निर्णय लागू झाला त्यावेळी 500च्या 17 अब्ज 16 लाख 5 हजार नोटा चलनात होत्या. तर 1 हजाराच्या सहा अब्ज 85 लाख 8 हजार नोटा चलनात होत्या.  पुन्हा एकदा तेवढ्याच किमतीच्या नोटा बाजारात आणायच्या असतील आणखी दोन महिने लागतील, असा स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचं मत आहे.