मुंबई : रिझर्व बँकेने बँक ग्राहकांना विशेषतः एटीएम धारकांना नववर्षात मोठा दिलासा दिला आहे.
नोटबंदीनंतर एटीएममधून पैसै काढण्याची मर्यात अडीच हजार करण्यात आली होती ती आता आपल्या खात्यातून एका दिवसात ४५०० रुपये काढण्याची मुभा दिली आहे. १ जानेवारीपासून तुम्ही खात्याच्या एटीएममधून हे पैसे काढू शकणार आहेत.
नोटबंदीनंतर एटीएम आणि बँकांच्या रोख रक्कम काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. एकावेळी जास्त जास्त २५०० रुपये काढता येते होते. त्यातही २००० रुपयांच्या नोटा असल्याने फक्त २ हजार रुपयेच काढता येत होते.
नोटांची टंचाई असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला होता. आता ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.