दिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण

 दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 

Updated: Dec 28, 2015, 05:18 PM IST
दिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण  title=

नवी दिल्ली :  दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 

अपहरणानंतर काही तासात या विद्यार्थिनीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. ही मुलगी सुरक्षित असल्याचा दावा गुडगाव पोलिसांनी केलाय. 

अपहरणकर्त्यांनी कॉलेजच्या गेटसमोरच या तरूणीला जबरदस्तीनं ओढत नेऊन गाडीत घातलं आणि गाडीतून तिला घेऊन गेले. नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून हे अपहरणकर्ते आले होते. 

एकूण चार अपरहरणकर्ते असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मुलगी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली असली, तरी अपहरणकर्त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय का, याबाबत मात्र कुठलीही माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.