नवी दिल्ली : सीबीआयने बंगळूरुमध्ये दोन अन्य लोकांसह एका आरबीआय अधिकाऱ्याला अटक केलीये. अटक केलेल्यांकडून सीबीआयने 17 लाख रुपये जप्त करण्यात आलेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआय बंगळुरूमध्ये सीनियर स्पेशल असिस्टंटच्या पदावर कार्यरत असलेले मायकेल यांना सीबीआयने अटक केलीये.
दलालांसह मिळून हे लोक काळा पैसा पांढरा करत असल्याचा आरोप यांच्यावर करण्यात आलाय. सीबीआयने यांना स्टेट बँक ऑफ मैसूरमध्ये तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या प्रकरणात ताब्यात घेतलेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर बँकेतील काही अधिकारी तसेच दलाल मिळून काळा पैसा पांढरा करतायत.