शिक्षक भरती घोटाळा : ओम प्रकाश चौटाला दोषी

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांना शिक्षक भरती घोट्याळ दोषी ठरविण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 16, 2013, 12:49 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांना शिक्षक भरती घोट्याळ दोषी ठरविण्यात आले आहे.
दिल्लीतील एका न्यायालयाने आपला निकाल देताना माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांवर शिक्षकांची गैर भरती केल्याचा ठपका ठेवला आहे. बेकायदा शिक्षक भरतीप्रकरणी या सर्वांना दोषी ठरविण्यात आलेय. शिक्षकांची करण्यात आलेली भरती ही कायद्याला धरून नाही. त्यामुळे ती बेकायदा आहे, असे न्यायालयाने म्हटलेय.
न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीय. या सर्वांना काय शिक्षा द्यावी, यासाठी २२ तारखेला पुढील सुनावणी होणार आहे.