चिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा

दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.

Updated: Sep 15, 2016, 12:25 PM IST
चिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. यावरून दिल्लीतलं 'आप'चं सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यामध्ये आता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. 

चिकनगुनियानं कोणीही मरत नाही, असं वक्तव्य सत्येंद्र जैन यांनी केलं आहे. हा दावा करताना त्यांनी गुगलचा दाखला दिला आहे. दिल्लीतल्या नागरिकांनी घाबरून जायचं कारण नसल्याचंही जैन म्हणाले आहेत. राज्य सरकार या आजाराचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि रुग्णांना मदत करेल अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.