www.24taas.com, नवी दिल्ली
चीनचे सुरक्षामंत्री जनरल लियांग गुआंग ली यांनी नुकताच भारतदौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीय हवाईदलातील (IAF) दोन वैमानिकांना रोख एक लाख रुपयांचं बक्षिस दिल्याचं उघड झालंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी भारतीय वायुसेनेनं ली यांना एक विशेष एअरक्राफ्ट दिलं होतं. यावेळी या एअरक्राफ्टमध्ये असणाऱ्या दोन वैमानिकांना एका बंद पाकिटात घालून रोख रक्कम दिली गेली. लियांग यांना निरोप दिल्यानंतर या वैमानिकांनी हे पाकिट उघडल्यानंतर आत एक लाख रुपये रोख रक्कम आढळली. हा प्रकार वायुसेनेच्यां मुख्याालयाला तत्कााळ कळविण्यायत आला. हा मुद्दा गंभीर आणि राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. त्याुमुळे ही रक्क्म चीनी संरक्षणमंत्र्यांना परत करणे योग्य ठरणार नाही, असं वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचं म्ह.णणं आहे. त्याकमुळे परेदशातून मिळालेल्या भेटवस्तूर जिथं ठेवण्याेत येतात तिथंच ही पाकिटं रक्कमेसह ठेवण्यात येणार आहेत.
हवाईदल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एकादा भारतीय अतिमहत्त्वाची व्यक्ती या एअरक्राफ्टमधून विदेश दौऱ्याला जातात तेव्हा त्यांच्याकडूनही काही छोट्या मोठ्या वस्तू क्रू सदस्यांना देण्यात येतात. पण, रोख रक्कम देणं मात्र प्रोटोकॉलचा भंग मानला जातो.
चीनच्याक माजी पंतप्रधानांकडून १९९१ मध्ये अशा प्रकारे प्रोटोकॉलचा भंग झाला होता. त्यारवेळी ली. पेंग यांनी भारतीय गुप्तयचर विभागाच्यान अधिकाऱ्याला एका पाकिटात ५०० रुपये रोख दिले होते. त्या.वेळी ही रक्काम चीनच्याग दुतावासाकडे तत्कायळ परत करण्यायत आली होती.