पणजी : गोव्यात नरकासूराच्या भव्य स्पर्धा घेण्यात आल्यात. त्यानंतर समुद्रकिनारी नरकासूराचे दहन करत गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात. तर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये सुरांची मैफल रंगली.
उत्तर भारतातील रावण दहनाच्या प्रथेप्रमाणे गोव्यात नरकासूर दहनाची मोठी परंपरा आहे. दिवाळीच्या पूर्व संध्येला नरकासुराच्या अक्राळ विक्राळ भव्य प्रतिमा उभारल्या जातात आणि रात्रभर त्याच्या पुढे संगीताचा तालावर डान्स केला जातो. नरकचतुर्दशीच्या भल्या पहाटे या नरकासुराचे दहन केलं जातं. आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
सालाबादा प्रमाणं यंदाही गोवेकरांनी नरकासूराचं दहन केलं. यंदाही गोव्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात नरकासूराच्या प्रतिमा तयार करण्यात आल्या होत्या. रात्री त्यांची स्पर्धा आयोजीत केल्यानंतर भल्या पहाटे समुद्र किनारी या नरकासूरांच दहन करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.