सामान्य माणासाच्या ट्विटला पंतप्रधानांचं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

Updated: Mar 15, 2017, 04:40 PM IST
सामान्य माणासाच्या ट्विटला पंतप्रधानांचं उत्तर title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर अजीत सिंह यांनी पंतप्रधानांना उद्देशून एक ट्विट केलं. याला पंतप्रधानांनीही रिप्लाय दिला. 

तुम्ही नरेंद्र मोदींसाठी काम करता का असं मला एकानं विचारलं तेव्हा नाही मोदी माझ्यासाठी काम करतात असं मी उत्तर दिल्याचं अजीत म्हणाले. अजितच्या या ट्विटला मोदींनी प्रत्युत्तर दिलं. हो प्रत्येक भारतीयाचा प्रधान सेवक असण्याचा मला आनंद आहे, असं मोदी म्हणाले.