नवी दिल्ली : पोरबंदर समुद्रकिनाऱ्यावरची बोट ही तस्करांची राहिली असती तर त्यांनी बोटीत स्फोट घडवून आणला नसता, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलंय.
पोरबंदरच्या समुद्र किनाऱ्यापासून ३६५ किलोमीटर दूर समुद्रात तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोटला घेरलं, यानंतर त्यात ब्लास्ट झाला, ही बोट तस्करांची होती अशी चर्चा असतांना, देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी, ही बोट तस्कारांची राहिली असती तर त्यांनी ब्लास्ट केला नसता, असं म्हटलंय.
ही बोट सामान्य रस्त्याने भारतीय हद्दीत आलेली नाही, जर ही बोट तस्करांची होती, तर मग हे तस्कर पाकिस्तानी एजन्सीच्या संपर्कात का होते, असा सवालही मनोहर पर्रिकर यांनी केला आहे.
या बोटवर १२ ते १४ तासांची पाळत ठेवण्यात आली होती, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी भारतीय नेव्हीचं कौतुक केलं आहे.
भारतीय नेव्हीने भारतीय समुद्राच्या हद्दीत अर्ध्यारात्री मस्यमारी करणारी एक संशयित पाकिस्तानी नौकेला घेरलं, यात स्फोटकं होती. बोटीत अचानक स्फोट झाल्यानंतर या बोटमधील चार जणांचाही यात मृत्यू झाला.
३१ डिसेंबर रोजी पोरबंदर समुद्र किनाऱ्यात ३६५ किलोमीटर दूर ही घटना घडली, या घटना मुंबई हल्ल्यासारखी योजना तर नव्हती ना, या दृष्टीकोनातून या घटनेकडे पाहण्यात येत आहे.
मुंबईवर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी देखिल बोटीने मुंबईत घुसले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.