काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षाने माजी मंत्र्यांना पाठवले अश्लील फोटो

जमशेदपूरमध्ये काँग्रेसच्या एका महिला जिल्हाध्यक्षाला पदावरुन हकलण्यात आलं आहे. मंजीत आनंद या महिलेने एका माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्याला व्हॉट्सअॅपवर काही अश्लील फोटो पाठवले. यानंतर हे फोटो संपूर्ण काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल झाले.

Updated: Jun 15, 2016, 07:06 PM IST
काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षाने माजी मंत्र्यांना पाठवले अश्लील फोटो title=

झारखंड : जमशेदपूरमध्ये काँग्रेसच्या एका महिला जिल्हाध्यक्षाला पदावरुन हकलण्यात आलं आहे. मंजीत आनंद या महिलेने एका माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्याला व्हॉट्सअॅपवर काही अश्लील फोटो पाठवले. यानंतर हे फोटो संपूर्ण काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल झाले.

एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर हे फोटो व्हायरल झाल्याने जिल्ह्यामध्ये तो चर्चेचा विषय बनला. हे फोटो चुकून पोस्ट झाले असंही नाही. कारण या महिलेने फोटो पाठवल्यानंतर फोन केला आणि फोटो कसे वाटले असंही विचारलं.

फोटो व्हायरल झाल्यानंतर मंजीत या महिलेने फोन उचलनं बंद केलं आहे. ते कोणाचाही फोन उचलंत नाही आहेत. पण पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली असल्याचं पक्षाच्या महिला अध्यक्षांनी म्हटलं आहे.