आघाडीचा फॉर्म्यूला बदलण्याची चिन्हं

आघाडी आणि जागावाटपाबाबत आपली भू्मिका ठरवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत आज रात्री बैठक पार पडली. यावेळी आघाडीचा फॉर्म्यूला यावेळी बदलण्याची चिन्हं असल्याचं दिसून येतंय. दोन्ही पक्षांना आणि उमेदवारांना न्याय मिळेल, अशी चर्चा बैठकीत झाल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटंल आहे.

Updated: Aug 7, 2014, 10:05 PM IST
आघाडीचा फॉर्म्यूला बदलण्याची चिन्हं title=

नवी दिल्ली : आघाडी आणि जागावाटपाबाबत आपली भू्मिका ठरवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत आज रात्री बैठक पार पडली. यावेळी आघाडीचा फॉर्म्यूला यावेळी बदलण्याची चिन्हं असल्याचं दिसून येतंय. कारण राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे, चर्चा यशस्वी झाल्यास 20 तारखेपर्यंत जागा वाटप शक्य असल्याचंही सांगण्यात येतंय. दोन्ही पक्षांना आणि उमेदवारांना न्याय मिळेल, अशी चर्चा बैठकीत झाल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटंल आहे.

दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. काल दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दरम्यान बैठक झाली.

यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी दहा जास्त, म्हणजेच 124 जागा सोडण्यास तयार असल्याचं समजतंय. काँग्रेसचा हा प्राथमिक प्रस्ताव राष्ट्रवादीनं अद्याप मान्य केलेला नाही. 144 नाही, तरी किमान १३० जागा पदरात पाडून घ्याव्यात, अशी NCPची भूमिका असल्याचं समजतंय. या सर्व मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.