चेन्नई : चेन्नईमध्ये वरदाह वादळ धडकलंय. ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहताहेत. त्यामुळं इथून पुढचे दोन तास धोक्याचे असल्याचे सांगण्यात येतंय. सतर्कतेचा इशारा म्हणून NDRFच्या वीस तुकड्या तामिळनाडू किनारी तैनात करण्यात आल्यात.
तत्पूर्वी सकाळी अकरा वाजल्यापासून पावसालाही सुरुवात झालीय. समुद्राच्या लाटांची उंची एक मीटरने वाढलीय. चेन्नई शहर, कांचीपुरम जिल्हा आणि तिरुवल्लूर जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. घरात पुरेसा किराणा माल भरून ठेवा आणि पुढच्या सूचना येईपर्यंत घरातून बाहेर पडू नका, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्यात.
चेन्नई आणि परिसरातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय. खाजगी संस्थांनी आज कर्मचा-यांना सुट्टी द्यावी किंवा त्यांना घरातून काम करण्याची भुभा द्यावी, असं आवाहन सरकारनं केलंय.
चेन्नईच्या काही किलोमीटर परिसरातच हे वादळ धडकेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. वरदाह हा ऊर्दू शब्द असून इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ रेड रोज अर्थात लाल गुलाब असा आहे.