लाचखोरीसाठी अधिकारी तुरुंगात, पत्नी-मुलीनं केली आत्महत्या

केंद्रीय चौकशी पथकानं दोन दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली कॉर्पोरेट व्यवहार महासंचालक बी के बन्सल यांना अटक केली होती. यानंतर आज बन्स यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे.

Updated: Jul 19, 2016, 11:20 PM IST
लाचखोरीसाठी अधिकारी तुरुंगात, पत्नी-मुलीनं केली आत्महत्या  title=

नवी दिल्ली : केंद्रीय चौकशी पथकानं दोन दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली कॉर्पोरेट व्यवहार महासंचालक बी के बन्सल यांना अटक केली होती. यानंतर आज बन्स यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बन्सल यांची पत्नी सत्यबाला (५७ वर्ष) आणि मुलगी नेहा (२७ वर्ष) यांनी दिल्ली स्थित राहत्या घरी आत्महत्या केलीय. एका फोननंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  

महत्त्वाचं म्हणजे, सत्यबाला आणि नेहा यांच्या दोन स्वतंत्र सुसाइड नोटही पोलिसांच्या हाती लागल्यात. यामध्ये, आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार ठरवलं जाऊ नये, असं त्यांनी म्हटलंय.

कॉर्पोरेट प्रकरणाच्या मंत्रालयात अतिरिक्त सचिव स्तरावरचे अधिकारी असलेल्या बन्सल यांना १७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. एका प्रमुख औषध निर्मात्या कंपनीकडून कथित स्वरुपात लाच घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली होती.