डॉन दाऊद देतो गुंडाना पेन्शन, मुलांच्या शिक्षणाचा भार उचलतो
नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक गुंडानची चांगलीच काळजी घेतो. पोलिसांच्याकडून मारण्यात आलेल्या, जेलमध्ये बंद असलेल्या गुंडाच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेच त्यांचे अॅडमिशन करणे. तसेच कुटुंबीयांना पैसे पुरविण्याचे काम तो व्यवस्थित करतो.
भारतीय सुरक्षा यंत्रणाच्या हाती आलेल्या माहितीनुसार दाऊद हा जेलमध्ये असणाऱ्या त्यांच्या माणसांना तसेच पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या गँगस्टरच्या घराच्यांची काळजी घेतो. फोनवर करण्यात आलेले संभाषण सुरक्षा यंत्रणाच्या हाती लागले आहे.
यात दाऊदच्या गँगमधील जेलमध्ये असलेल्या गुंडांच्या मुलीला पैसे पोहोचवण्यासंबधी एक महिला बोलत असल्याचे रेकॉर्ड करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यामध्ये आणखी एका संभाषणात वृद्ध महिला छोटा शकीलला सांगत होती, या महिन्याची पेन्शन मिळाली नाही. त्यावर छोटा शकीलने तिला एका मुंबईमधील असलेल्या साथीदाराला भेटण्यासाठी सांगितले होते.
शकील स्वत: दाऊदच्या गँगमधील गँगस्टरच्या घरच्यांची काळजी घेतो. त्यांना काय हवे, काय नको तसेच त्यांना काही अन्य काही समस्या असतील तर त्याही सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेच दाऊद गँगमध्ये काम करणारे गुंड ही त्याच्यासाठी जीव द्यालाही मागे पुढे पाहत नाहीत, अशी चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.