अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये प्रतिष्ठितांची पोलखोल

नुकत्याच समोर आलेल्या अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचं धक्कादायक सत्य समोर येतंय. 

Updated: Dec 8, 2015, 12:00 PM IST
अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये प्रतिष्ठितांची पोलखोल title=

नवी दिल्ली : नुकत्याच समोर आलेल्या अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचं धक्कादायक सत्य समोर येतंय. 

ग्रामीण आणि छोट्या भागांतील तरुणींना सेक्स स्कँडलमध्ये फसवल्या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केलीय. यामध्ये दोन स्थानिक दुकानदारांचा समावेश आहे. सोमवारी रात्री उशीरा अखनूरच्या वेगवेगळ्या भागांत मारलेल्या छाप्यानंतर एकच खळबळ उडालीय. कारण, या छाप्यांत या प्रकरणात समाविष्ट असलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचीही नावं पोलिसांच्या हाती लागलीत. 

राजनैतिक आणि व्यापार जगतातील या प्रतिष्ठीत व्यक्तींची कधी कोणी कल्पनाही केली नसेल, की या व्यक्तींचाही सेक्स स्कँडलसारख्या प्रकरणात समावेश असेल... पोलिसांच्या छाप्यात हाती लागलेल्या एका तरुणीनं पोलिसांसमोर ही माहिती उघड केलीय.  

पोलिसांनी अखनूरमध्ये केलेल्या कारवाईनंतर अनेक दुकारदार आणि नेते भूमिगत झालेत.... तर काही जण अखनूरमधूनच फरार झालेत.

या प्रकरणात सहभागी असलेल्या सगळ्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.