अलीगड : एकाला मृत समजून दवाखान्याच्या शवागारात ठेवण्यात आलं. पोलिसांना 20 ऑगस्ट रोजी एक व्यक्ती जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूवा पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला अलिगडच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं.
त्याला वॉर्ड नं 6 मध्ये दाखल करण्यात आलं, या वॉर्डला 'लावारीस वार्ड' असंही म्हणतात. या वार्डमध्ये फक्त दोन बेड आहेत.
या पेशंटचा 29 ऑगस्ट रोजी मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं, पण या व्यक्तीला मृत कुणी घोषित केलं हे समजू शकलं नाही. या नंतर वार्ड बंद ठेवण्यात आला.
अखेर 31 ऑगस्ट रोजी या व्यक्तीचं पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेण्यात आला. मृतदेह घेण्यासाठी पोलिस दाखल झाले, त्यांनी या वार्डचं दार उघडलं आणि पोलिस चक्रावले कारण हा मृत व्यक्ती बेडच्या खाली लोळत होता.
हा व्यक्ती जिवंत असल्याने पोलिस परतले, आता डॉक्टर पुढील चौकशी करतायत की, कुणाच्या चुकीमुळे या व्यक्तीला मृत मानलं गेलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.