भारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील - संरक्षण मंत्री अरुण जेटली

शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर पाकिस्तानची नापाक वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे. त्यांनी म्हटलं की 'जवानांचं हे हौतात्म्य वाया नाही जाणार.'

Updated: May 1, 2017, 08:58 PM IST
भारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील - संरक्षण मंत्री अरुण जेटली title=

नवी दिल्ली : शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर पाकिस्तानची नापाक वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे. त्यांनी म्हटलं की 'जवानांचं हे हौतात्म्य वाया नाही जाणार.'

जेटलींनी म्हटलं की, 'भारतीय लष्कराला देखील याचं सडेतोड उत्तर दिलं पाहिजे आणि ते देणार. पाकिस्तानची ही हरकत अमानवीय आहे. असं तर युद्धाच्या वेळी देखील नाही केलं जातं.'

सीमेवर गस्त घालत असलेल्या दोघा भारतीय जवानांची पाकिस्तानी लष्करानं निर्घृण हत्या केली. त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. हत्येनंतर मृतदेहांची विटंबना करण्यात आली. भारतीय लष्करानं देखील या हीन कृत्याबद्दल पाकिस्तानचा निषेध केला आहे.