रेल्वेचा भयंकर अपघात; 30 ठार, 150 जखमी

त्तर प्रदेशात शुक्रवारी सकाळी डेराढून - वाराणसी जनता एक्स्प्रेस रूळांवरून घसरुन झालेल्या अपघातात 30 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय

Updated: Mar 20, 2015, 03:30 PM IST
रेल्वेचा भयंकर अपघात; 30 ठार, 150 जखमी title=

लखनऊ : उत्तर प्रदेशात शुक्रवारी सकाळी डेराढून - वाराणसी जनता एक्स्प्रेस रूळांवरून घसरुन झालेल्या अपघातात 30 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय तर जवळपास150 जण गंभीर जखमी आहेत. उत्तरप्रदेशातील येथील रायबरेलीनजिक हा अपघात घडला. 

जनता एक्सप्रेसचे तीन डबे रूळांवरून खाली घसरले आहेत. यामध्ये जखमींचा झालेल्या लोकांचा आकडाही  वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि रेल्वेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरूवात केली. 

रेल्वे डब्यांच्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.