नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज मंगळवारी निकाल जाहीर झाला. दिल्लीच्या राजकारणात 'आप'ची जादू दिसून आली आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाचा लाजीरवाना पराभव झालाय. या निवडणुकीत आपच्या उमेदवारांना बाजी मारली. आपचे 67 उमेदवारांनी आघाडी घेत अन्य पक्षांचा सुफडा साफ केलाय.
विजयी उमेदवार :
दिल्लीच्या 70 जागांचे निकाल जाहीर झालेत. यामध्ये आपने 67 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवत विरोधी पक्षनेते पदही आपल्याकडे राखण्यात बाजी मारली आहे. तर भाजपचे केवळ तीनच उमेदवार विजयी झालेत. काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. तर बहुजन समाज पार्टीला अपेक्षीत मते न पडल्याने त्या पक्षाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह आहे.
भाजपचे त्रिकूट
दिल्लीमध्ये भाजपचा सुफडा साफ झाला. केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतके म्हणजे तीनजण निवडणुकीत विजयी झालेत.
- जगदीश प्रधान हे मुस्तफाबादमधून
- विजेंद्र प्रधान हे रोहीणी मतदार संघातून
-ओमप्रकाश शर्मा हे विश्वास मतदार संघातून
- 'आप'चे हजारी लाल चौहान पटेल नगर मतदार संघातून विजयी
- 'आप'चे इमरान हुसैन हे बल्लीमारान मतदार संघातून यांनी भाजपच्या श्याम लाल मोरवाल यांचा 33877 मतांनी केला पराभव.
- 'आप'चे शिवचरण गोयल हे मोती नगर मतदार संघातून भाजपच्या सुभाष सचदेवा यांचा 15221 मतांनी केला पराभव.
- 'आप'चे जगदीप सिंह हे हरिनगर येथून विजयी
- 'आप'चे जरनैल सिंग हे तिलकनगर येथून विजयी
- 'आप'चे आदर्श शास्त्री हे द्वारका येथून विजयी
- 'आप'चे सुरेंद्र सिंह दिल्ली कॅटोमेंटबोर्ड येथून विजयी
- 'आप'चे प्रवीण कुमार हे जंगपुरा येथून विजयी
- 'आप'चे मनिष सिसोदिया पपडगंज मतदार सघातून विजयी
- 'आप'चे कर्नल देवेंद्र सहरावत यांनी भाजपच्या सतप्रकाश राणा यांना 19536 मतांनी पराभूत केले. बिजवासन मतदार संघातून सहरावत विजयी.
- 'आप'चे प्रवीण कुमार जंगपुरा मतदार संघातून विजयी
- 'आप'चे सुरेंदर सिंग विजयी
- किरण बेदी कृष्णनगर मतदार संघातून 2500 मतांनी पराभूत
- 'आप'चे फतेह सिंग गोकालपूर मतदान संघातून 71240 मतांनी विजयी
- 'आप'चे कपिल मिश्रा करवाल नगर मतदर संघातून 101865 मतांनी विजयी
- 'आप'चेसोम दत्त सदर बाजार मतदार संघातून विजयी
- भाजपचे जगदीश प्रधान मुस्तफाबाद मतदार संघातून 58388 मतांनी विजयी
- 'आप'चे अरविंद केजरीवाल 26 हजार मतांनी विजयी
- 'आप'चे के एस के बग्गा यांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांना पराभूत केल.
- माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या नवख्या आणि तरुण उमेदवार नुपूर शर्मा यांचा पराभव केला.
- रोहिणी येथून भाजपचे विजेंदर गुप्ता यांनी विजय मिळवला.
- काँग्रेस उमेदवार अजय माकन यांचा पराभव झालाय.
- 'आप'च्या अलका लांबा या चांदणी चौक येथून विजयी.
- 'आप'चे अवतार सिंग कालकाजी येथून विजयी झालेत.
- 'आप'चे सत्येंद्र जैन यांनी शकूरबस्तीतून आपला विजय साकार केला.
- 'आप'चे ज्येष्ठ नेते गोपाल राय हे बाबरपूर येथून 35 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.
- 'आप'चे मोहम्मद इशरक हे सीलमपूर मतदार संघातून विजयी
- 'आप'चे जगदीप सिंग हरी नगर मतदार संघातून विजयी
- 'आप'चे आदर्श शास्त्री द्वारका मतदार संघातून विजयी
- भाजपचे प्रकश शर्मा हे विश्वास नगर मतदार संघातून विजयी
- 'आप'चे जर्नेलसिंग राजौरी गार्डनमधून 54916 मतांनी विजयी.
- 'आप'चे सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाश दक्षिण दिल्लीमधून विजयी
- 'आप'चे मोहिंदर गोयल रिथाला मतदार संघातून 93470 मतांनी विजयी
- 'आप'चे साही राम तुघलकाबाद मतदार संघातून 62143 मतांनी विजयी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.