बेदींचा नव्हे नरेंद्र मोदींचा व्यक्तीगत पराभव : अण्णा हजारे

 दिल्लीत सहा सभा घेऊनही भाजपला आलेले अपयश हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत पराभव आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची हवा नव्हती आणि नाही, लोकांना जे आश्वासन दिलं होतं, त्याचं पालन न केल्यानं नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी झाली,  या विजयानंतर आप चांगले काम करेल, अशी आशा आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

Updated: Feb 10, 2015, 12:53 PM IST
बेदींचा नव्हे नरेंद्र मोदींचा व्यक्तीगत पराभव  : अण्णा हजारे title=

नवी दिल्ली :  दिल्लीत सहा सभा घेऊनही भाजपला आलेले अपयश हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत पराभव आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची हवा नव्हती आणि नाही, लोकांना जे आश्वासन दिलं होतं, त्याचं पालन न केल्यानं नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी झाली,  या विजयानंतर आप चांगले काम करेल, अशी आशा आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

भूमी अधिग्रहण कायद्यातील बदल शेतकऱ्यांसाठी भयानक - अण्णा
भूमी अधिग्रहण कायद्यात जे बदल करण्यात आले आहेत, ते शेतकऱ्यांसाठी भयानक आहेत, शेतकरीविरोधी भूमिका सरकारने घेतल्यानंतर जनता शांत बसणार नसल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. अच्छे दिन फक्त उद्योगपतींसाठी म्हणून भाजपला सावध होणं आवश्यक आहे, तसेच जनता ही सर्वात मोठी संसद असल्याचं अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. 

अण्णांचा अरविंद केजरीवाल यांना सल्ला
माझी अरविंदकडे एकच प्रार्थना, पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर ज्या चुका झाल्या होत्या त्याची पुनरावृत्ती नको, मेट्रोमधून प्रवास करणं, रामलीला मैदानात शपथविधी घेणंस, अशा गोष्टींपेक्षा साध्या गोष्टी करण्याची अपेक्षा अण्णांनी यावेळी व्यक्त केली.

केजरीवाल हुशार अण्णांची शाबासकी
मी अरविंद केजरीवाल यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता,  तेव्हा त्यांनी राजीनामा दिला, पण, नंतर त्यांनी आपली चूक मान्यही केली, म्हणून त्यांची विश्वासार्हता वाढली.

अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी केलेली चूक पुन्हा करू नये, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. पण मी अरविंदला सांगावं एवढा अरविंद खुळा नाही, मी अनेक वर्ष अरविंदला पाहिलेलं आहे, त्याचा अनुभव जास्त आहे, माझ्यापेक्षा तो खूप ज्ञानी आहे, खडकपूर आयआयटीचा तो विद्यार्थी आहे.
 
अरविंदने जनआंदोलनाला विसरू नये - अण्णा

केजरीवाल यांच्या विजयानंतर अण्णा म्हणाले, 'दिल्लीकरांना आपला निवडून योग्य निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी जनलोकपाल आंदोलन विसरू नये. आंदोलन ही एकच अशी ताकद आहे, जी देशात बदल घडवू शकते. पंतप्रधान मोदी यांना भ्रष्टाचार रोखण्यात अपयश आले आहे. मोदींनी नागरिकांची विश्वास गमावला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.