नवी दिल्ली : दिल्लीतल्या नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या सहा मजली इमारतीला मध्यरात्री उशीरा आग लागली. याता दोन कर्मचारी जखमी झालेत.
भीषण स्वरुपाच्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्याला आग लागली. त्यानंतर या आगीनं संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतलं. यात इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात, अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दुर्घटनाग्रस्त नॅशनल म्युझियम इमारतीच्या बाजूलाच फिक्कीचं कार्यालय आहे.
Fire which broke out at Delhi's Natural History Museum near FICCI auditorium(earlier visuals),now under control pic.twitter.com/zRxff7AbuC
— ANI (@ANI_news) April 26, 2016
मात्र या आगीची फिक्की कार्यालयाला कोणत्याही प्रकारची झळ बसलेली नाही. आगीवर पहाटे सहा वाजण्याच्या सुमाराला नियंत्रण मिळवलं गेलं.
WATCH: Fire which broke out at Delhi's Natural History Museum at around 2 am today morning (earlier visuals)https://t.co/ygh6K86G4Y
— ANI (@ANI_news) April 26, 2016