नवी दिल्ली : टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिंह धोनीच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. धोनीची झेड सुरक्षा आता वाय दर्जाची करण्यात आली आहे.
धोनीच्या खासगी सुरक्षेत आधी चार कर्मचारी होते. आता दोन कर्मचारी असतील, मात्र पोलिसांच्या संख्येत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही,
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष व्यक्तींना दिलेल्या सुरक्षेत वेळोवेळी समीक्षा केली जाते.
ही समीक्षा राज्यातील सुरक्षा संबंधित समिती करत असते. या समितीत राज्याचे वरिष्ठ पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर विभागाचे अधिकारी सामिल असतात.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धोनीच्या सुरक्षेच्या समिक्षेत कोणत्याही धोक्याची शक्यता दिसली नाही. धोनीच्या सुरक्षेत नऊ कर्मचारी होते, ती संख्या आता सात झाली आहे.
एक वेळ अशीही होती की टीम इंडियाने टवेन्टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीला महिला कमांडोंची सुरक्षा देण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.