अमित शाह यांच्या टीममध्ये महाराष्ट्रातून कोण?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर आता अमित शाह आपल्या टीममध्ये कोणाचा समावेश करतात याकडे लक्ष लागलयं. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आणा, असं आवाहन शाह यांनी कार्यकर्त्यांना केले.

Updated: Aug 12, 2014, 06:53 PM IST
अमित शाह यांच्या टीममध्ये महाराष्ट्रातून कोण? title=

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर आता अमित शाह आपल्या टीममध्ये कोणाचा समावेश करतात याकडे लक्ष लागलयं. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आणा, असं आवाहन शाह यांनी कार्यकर्त्यांना केले.

टीम शाहमध्ये तरुण आणि महिलांचा मोठया प्रमाणात समावेश असेल असे संकेत मिळताहेत. १० जनरल सेक्रेटरी आणि १० सेक्रेटरी नव्यानं नियुक्त केले जाणार आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू आणि काश्मीर राज्यात होणा-या विधानसभा निवडणुका जिंकण्याचं आव्हान टीम शाहसमोर असणार आहे.

राम माधव, वरुण गांधी, राजीव प्रताप रुडी, जे पी नड्डा यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात होणा-या विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रातील नेत्यांचाही मोठी जबाबदारी टीम शाह मध्ये देण्यात येईल असे संकेत आहेत. पूनम महाजन, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांची निवड टीम शाहमध्ये होऊ शकते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.