तंबाखूच्या वक्तव्यावर खासदार दिलीप गांधींना दणका

तंबाखूसेवनाचे पुरस्कर्ते खासदार दिलीप गांधी यांना दणका बसलाय. तंबाखू व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना धूम्रपानाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीमधून काढून टाकण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचं समजतंय.

Updated: Apr 5, 2015, 11:40 PM IST
तंबाखूच्या वक्तव्यावर खासदार दिलीप गांधींना दणका  title=

नवी दिल्ली : तंबाखूसेवनाचे पुरस्कर्ते खासदार दिलीप गांधी यांना दणका बसलाय. तंबाखू व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना धूम्रपानाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीमधून काढून टाकण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचं समजतंय.

या समितीमधील काहींचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचं निष्पन्न झाल्यानं या समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.. अखेर पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन अशा सदस्यांना काढून टाकण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिलेत.. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.