२३ जानेवारी २०१६ पासून नेताजींसंबंधीत फाईल्स सार्वजनिक करणार - पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं खुल्या केल्यानंतर केंद्र सरकारनंही त्यांच्याजवळील दस्ताऐवज खुले करावे अशी मागणी होती. आज याचसंदर्भात नेताजींच्या ३५ वंशजांनी मोदींच्या निवासस्थानी ७ आरसीआरवर त्यांची भेट घेतली. 

Updated: Oct 15, 2015, 10:14 AM IST
२३ जानेवारी २०१६ पासून नेताजींसंबंधीत फाईल्स सार्वजनिक करणार - पंतप्रधान   title=

नवी दिल्ली: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं खुल्या केल्यानंतर केंद्र सरकारनंही त्यांच्याजवळील दस्ताऐवज खुले करावे अशी मागणी होती. आज याचसंदर्भात नेताजींच्या ३५ वंशजांनी मोदींच्या निवासस्थानी ७ आरसीआरवर त्यांची भेट घेतली. 

या भेटीनंकप नेताजींसंदर्भातील केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले दस्तावेज जनतेसाठी खुले करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी जाहीर केलं आहे. सुभाषबाबुंच्या ३५ वंशजांनी आज मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमच्यामध्ये अत्यंत चांगल्याप्रकारे चर्चा झाल्याचं मोदींनी ट्विट केलं आहे.

आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक

पश्चिम बंगाल सरकारनं नेताजींच्या संदर्भातले दस्तावेज गेल्या महिन्यात खुले केले. नेताजींच्या मृत्यूबाबत गूढ असून या दस्तावेजांच्या आधारे त्यांच्या अंतिम दिनासंदर्भातील सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. नेताजी सुभाष चंद्र बोसांच्या जन्मदिनापासून म्हणजे २३ जानेवारी २०१६ पासून दस्तावेज खुली करण्याची प्रक्रिया सुरू होईल असं मोदी यांनी जाहीर केलं आहे.

विशेष म्हणजे, जगभरातील ज्या ज्या देशांकडे नेताजींसदर्भात सरकारी दस्तावेज आहेत त्यांनीही ते खुले करावेत अशी मागणी आपण करू आणि सगळ्यात आधी रशियाला डिसेंबरमध्ये तशी विनंती करू असंही मोदींनी सांगितलं आहे.

पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारच्या दफ्तरी असलेल्या या कागदपत्रांचा तज्ज्ञ अभ्यास करतील आणि नेताजींच्या मृत्यूचं गूढ उकलतील अशी अपेक्षा आहे.

आणखी वाचा - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जिवंत होते सुभाष चंद्र बोस?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.