गाईच्या बाबतीत काही रंजक गोष्टी, वाचून तुम्ही व्हाल हैराण

हिंदू धर्मात गाईचं महत्व मोठ्या प्रमाणात राहिलेलं नाही, कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. मात्र भारतासारखे अनेक कृषीप्रधान देश आहेत, मात्र भारतात गाईला जेवढं महत्व दिलं जातं किंवा आहे ते इतर देशांमध्ये नाही.

Updated: Oct 14, 2015, 06:10 PM IST
गाईच्या बाबतीत काही रंजक गोष्टी, वाचून तुम्ही व्हाल हैराण title=

मुंबई : हिंदू धर्मात गाईचं महत्व मोठ्या प्रमाणात राहिलेलं नाही, कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. मात्र भारतासारखे अनेक कृषीप्रधान देश आहेत, मात्र भारतात गाईला जेवढं महत्व दिलं जातं किंवा आहे ते इतर देशांमध्ये नाही.

हिंदू धर्मातील गाईचं महत्व काही अध्यात्मिक, धार्मिक आणि चिकित्सीय कारणांमुळे देखील आहे.

गाईमागील काही वैज्ञानिक गोष्टी जाणून घेऊ या....

  • गाय एक मात्र असा पशू आहे, जो सर्वाच्या सेवेत, सर्वांच्या कामी येतो.
  • स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, गाय आपल्या संपूर्ण जीवनात ४ लाख १० हजार ४४० लोकांना खाद्य पुरवते, तर दुसरीकडे तिच्या मांसापासून ८० हजार मांसाहारी लोक आपलं पोट भरतात.
  • गाईचं दूध, मूत्र, शेण शिवाय दुधापासून तूप, दही, ताक, लोणी हे सर्व उपयोगी पदार्थ आहेत.
  • पूर्ण संसदेने गौवधवर बंदीसाठी समर्थन केलं होतं, यावर तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी म्हटलं होतं, हा प्रस्ताव पास झाला तर मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन.
  • एका माहितीनुसार मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात गौवध अपवादात्मक स्वरूपात होत होता. जास्तच जास्त शासकांना हिंदुंना खूश करून आपलं शासन त्यांना मजबूत करायचं होतं.
  • इंग्रजांनी भारतात गोहत्यावाढीला वाव दिला, गोहत्या आपण करत नसल्याचा दिखावा करण्यासाठी त्यांनी कत्तलखान्यात मुस्लिम कसायांची नियुक्ती केली.
  • गुरू वशिष्ठ यांनी गायीच्या कुळाचा विस्तार केला आणि गाईच्या नवीन जाती देखील शोधून काढल्या, तेव्हा गाईच्या फक्त ८ ते १० जाती होत्या, ज्याचं नाव कामधेनू, कपिला, देवनी, नंदनी, भौमा अशी होती.
  • असं म्हटलं जातं, भगवान श्रीकृष्णानेही गाईचं महत्व वाढवण्यासाठी गाय पूजा आणि गौशालांची निर्मिती केली, भगवान बालकृष्ण गाय चारण्याला गोपाष्टमीपासून सुरूवात करतात.
  • पंजाब केसरी महाराजा रणजीत सिंह यांनी आपल्या शासनकाळात राज्यात गोहत्या करणाऱ्यांना मृत्यूची शिक्षा जाहीर केली होती.
  • रामचंद्र बीर यांनी गो हत्येवर बंदी लावण्यासाठी ७० दिवसांपर्यंत उपोषण केलं होतं.
  • शास्त्रीय शोधानुसार गाईत जेवढी सकारात्मक उर्जा आहे, तेवढी कोणत्याही प्राण्यात नाही.
  • असंही म्हणतात की, गाईच्या पाठीच्या कणाचं हाड सूर्यकेतू स्नायू हानिकारक विकिरणांना थोपवून वातावरण स्वच्छ करतो, पर्यावरणासाठी हे लाभदायक आहे.
  • गाईच्या पाठीच्या कणा सूर्यकेतू नाडी, सर्वरोगनाशक, सर्वविषनाशक आहे.
  • सूर्यकेतू नाडी सूर्याच्या संपर्कात आल्याने सोन्याची निर्मिती करते असं म्हटलं जातं, गाईच्या शरीरात तयार होणार सोनं दूध, गोमूत्र आणि शेणातून मिळतं. 
  • शास्त्रज्ञांच्या मते गाय असा एकमात्र प्राणी आहे जो ऑक्सिजन ग्रहण करतो, ऑक्सिजन सोडतो, मात्र मनुष्यासह सर्वच प्राणी ऑक्सिजन घेतात आणि कार्बनडाय ऑक्साईड सोडतात, झाडं-झुडपं नेमकं याच्या उलट करतात.
  • देशी गाईच्या एक ग्राम शेणात ३०० कोटी जीवाणू आहेत.
  • रशियात गाईचं तूप हवन केल्यावर शास्त्रीय प्रयोग झाले आहेत.
  • एक तोळा म्हणजेच १० ग्रॅम तुपाचा यज्ञ केला, तर एक टन ऑक्सिजनची निर्मिती होते, असं म्हटलं जातं.
  • जगातील सर्वात मोठी गौशाळा पथमेडा राजस्थानमध्ये आहे.
  • गौवंशीय पशू अधिनियम १९९५ अंतर्गत १० वर्षांपर्यंत जेल आणि १० हजार रूपयांचा दंड आहे.
  • एक वेळ अशी होती की, भारतीय शेतकरी कृषी क्षेत्रात जगात परिपूर्ण होता. त्याचं कारण गाय होतं.
  • भारतीय गाईचं शेणाने तयार झालेल खतं शेतीसाठी सर्वोत्कृष्ट आहे, शेतीसाठी भारतीय गाईचं शेण अमृतासमान मानलं जातं.
  • हरित क्रांतीच्या नावावर सन १९६० ते १९८५ मध्ये रासायनिक शेतीद्वारी भारतीय शेती नष्ट करण्याचं काम करण्यात आल्याचे आरोप होतात, शेतात आता खत राहिलेलं नाही, रासायनिक खतं वापरल्याने कॅन्सरसारखे आजार वाढले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.