नवी दिल्ली: भारतीय लोकांना चायनीज जास्त आवडतं असं वरवरचं चित्र आहे, पण, जगभरात भारतीय जेवणालाच लोकांनी पसंती दिली आहे.
'भारतीय खाद्यपदार्थांना जगभरात चायनीज फूडच्या तुलनेत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतीय खाद्य पदार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर चायनीज फूडशी स्पर्धा करीत आहेत, भारतीय पाककृतींनी जगभरात आपली वेगळी छाप पाडली आहे. त्याने चायनीज फूडला मागे टाकले आहेअसं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध शेफ अजय चोप्रा म्हणाले.
'उत्तर भारतातील लोक जेवणात लोणी, स्थानिक मसाले, मटण आणि चिकनचा वापर जास्त करतात. मात्र दुसरीकडे दक्षिण भारतातील लोक स्वयंपाकात नारळ कडिपत्ता, तसेच अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर करतात', असं ‘द वेस्टिन मुंबई गार्डन सिटी’चे एक्झिक्यूटिव्ह शेफ अजय चोप्रा यांनी सांगितलं