लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता

लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.

Updated: Nov 21, 2016, 10:58 AM IST
लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.

काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी उरीच्या हल्ल्यातील शहिदांची तुलना बँकेबाहेर झालेल्या लोकांच्या मृत्यूशी केल्यानं सत्ताधारी संतापले आहेत. आझाद यांनी माफी मागावी यासाठी राज्यसभेत गोंधळ घातला. आज पुन्हा हेच चित्र बघायला मिळण्याची चिन्हं आहेत. तिकडे लोकसभेत मतदानाशिवाय चर्चेला विरोधक तयार झालेले नाहीत. त्यामुळे आज दोन्ही सभागृहात गोंधळाचंच वातावरण राहिल अशी शक्यता आहे.