काश्मिरमध्ये ३ तरुणांच्या मृत्यूनंतर फुटिरतावाद्यांचा बंद

काश्मिरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात ३ तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर फुटिरतावाद्यांनी बंद पुकारलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 29, 2017, 09:56 AM IST
काश्मिरमध्ये ३ तरुणांच्या मृत्यूनंतर फुटिरतावाद्यांचा बंद  title=

जम्मू-काश्मिर : काश्मिरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात ३ तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर फुटिरतावाद्यांनी बंद पुकारलाय. त्यांनी या तरुणांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर काश्मीर युनिव्हर्सीटीच्या होणारी परिक्षा रद्द करण्यात आली आहे. तर कश्मीर घाटीत आज ट्रेन चालणार नाही.

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलं. त्याच्याकडे असलेला मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आलाय. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. 

दुरबुर्ग आणि चद्दुरा या भागात अतिरेकी दडून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर या भागात तपासमोहीम हाती घेण्यात आली. लपून बसलेल्या एकमेव अतिरेक्याला ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं. यावेळी स्थानिकांनी लष्कराला विरोध करण्यासाठी दगडफेक केली. मात्र, लष्कराने बळाचा वापर करत कारवाई सुरुच ठेवली.