डॉक्टर चुकीमुळे गेली 60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अमृतसरमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० लोकांवर गुरुवारी गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, याचा फटका या लोकांना बसला. त्यांची दृष्टीच गेली.

Updated: Dec 6, 2014, 01:52 PM IST
डॉक्टर चुकीमुळे गेली  60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश title=

चंदीगढ : अमृतसरमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० लोकांवर गुरुवारी गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, याचा फटका या लोकांना बसला. त्यांची दृष्टीच गेली.

60 लोकांना आपले  डोळे गमवावे लागले. सर्वजण गरीब कुटुंबातील आहेत. यातील १६ जण अमृतसर जिल्ह्यातील गांवातील आहेत तर  उर्वरित सर्वजण गुरुदासपूर येथील आहेत.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव विन्नी महाजन यांना उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.