काश्मीरमध्ये हल्ल्याचा पुन्हा धोका, हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध

काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेने निषेध केलाय. दरम्यान, हल्यासाठी पाकिस्ताने मदत केल्याचे आता उघड होत आहे. त्याचवेळी पुन्हा हल्ला होण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Updated: Dec 6, 2014, 12:07 PM IST
काश्मीरमध्ये हल्ल्याचा पुन्हा धोका,  हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध  title=

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेने निषेध केलाय. दरम्यान, हल्यासाठी पाकिस्ताने मदत केल्याचे आता उघड होत आहे. त्याचवेळी पुन्हा हल्ला होण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी वापरलेल्या सामानावर पाकिस्तानातील पत्ते आढळले आहेत. तर शस्त्रेही पाकिस्तान बनावटीची असल्याचे स्पष्ट झालेय. हे हल्ले पाकिस्तान पुरस्कृत असल्याचे या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.

काश्मीरमध्ये पुढील आठवड्यात आणखी दहशतवादी हल्ला होण्याची गुप्तचर खात्याची माहिती आहे. याबाबत संरक्षण दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.