पावसानेही घेतला कलामांसाठी 'एक छोटासा ब्रेक'

डॉ. कलाम यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सायंकाळी राष्ट्रपती भवनात चहा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला कलामांनी ३ हजार लोकांना बोलावलं होतं. ही पार्टी खुल्या मैदानात, म्हणजेच राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर होती.

Updated: Jul 28, 2015, 04:32 PM IST
पावसानेही घेतला कलामांसाठी 'एक छोटासा ब्रेक' title=

नवी दिल्ली : डॉ. कलाम यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सायंकाळी राष्ट्रपती भवनात चहा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला कलामांनी ३ हजार लोकांना बोलावलं होतं. ही पार्टी खुल्या मैदानात, म्हणजेच राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर होती.

चहा पार्टीच्या दिवशी सकाळी पाऊस सुरू झाला आणि तो बंद व्हायचं नाव घेत नव्हता, राष्ट्रपती भवनाचे अधिकारी चिंतेत होते, एवढ्या साऱ्या लोकांना राष्ट्रपती भवनात चहा द्यायचा कसा?, कसं तरी करून २ हजार छत्र्यांची व्यवस्था करण्यात आली.

राष्ट्रपतींचे सचिव नायर तणावात होते, सचिव दुपारी कलाम यांना भेटायला गेले, तेव्हा कलाम म्हणाले, "किती छान दिवस आहे, वातावरणात किती गारवा आहे."

सचिव थोडेस त्रस्त असल्यासारखेच म्हणाले, "तुम्ही ३ हजार लोकांना चहासाठी बोलावून ठेवलंय, पाऊस सुरूंय, आणि कसं होणार?"

"मैने उपर बात कर ली है"
डॉ.कलाम त्यांना म्हणाले, "चिंता करू नका आपण ३ हजार लोकांना राष्ट्रपती भवनात चहा पाजू, मैने उपर बात कर ली है"

डॉ.कलाम सचिव नायर यांच्याकडे पाहत म्हणाले, "आपण नाही तरी काय करू शकतो, पाऊस सुरूच राहिला तर आपण भिजून जाऊ, एवढंच ना".

सचिव प्रचंड तणावाखाली दिसले, ते दाराजवळ पोहोचत नाहीत, तोपर्यंत त्यांना डॉ.कलाम यांनी बोलावलं आणि आकाशाकडे पाहत सांगितलं, "तुम्ही चिंता सोडा, मी वरती बोलून घेतलंय".

तेव्हा दुपारचे १२ वाजून ३८ मिनिटं झाले होते, दुपारी २ वाजता अचानक पाऊस थांबला, सूर्याचं दर्शन झालं, बरोबर संध्याकाळी साडेपाच वाजता परंपरेनुसार कलाम लॉनवर आले.

डॉ. कलाम आपल्या गेस्टना भेटले, फोटो काढले, सव्वा सहा वाजता राष्ट्रगीत झालं. राष्ट्रपती भवनात डॉ. कलाम परतले आणि जोरदार पावसाला पुन्हा सुरूवात झाली. द वीकने दुसऱ्या दिवशी छापलं, निसर्गही कलामांच्या सोबत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.