डेहराडून : उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडूनमध्ये शनिवारी दारुच्या नशेत एका महिलेने भररस्त्यात चक्क गोंधळ घातला. नशेत टल्ली असलेली ही महिला चक्क रस्त्यावर झोपली. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांनीही तिने शिवीगाळही केली. तिच्या या गोंधळामुळे या रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडीही झाली होती.
शनिवारी संध्याकाळी ही महिला आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन परतत होती. यावेळी जोगीवाला रिंग रोडवर भररस्त्यातच महिलेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तिची ही अवस्था पाहून तिचे मित्र तेथून निघून आले.
यावेळी तेथून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांनाही शिवीगाळ केली. दरम्यान, काही वेळानंतर तेथील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.