वेबसाइट्सवर विकतात सेक्स पॅकेज

इंदूर हे व्यापाराच्या जगातील एक मोठं नाव... पण आता आणखी एक व्यापार वाढीला लागला आहे. त्या व्यापाराचं नाव आहे ई-सेक्स बाजार.... पण या सर्व गोष्टींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. 

Updated: Jul 24, 2014, 06:05 PM IST
वेबसाइट्सवर विकतात सेक्स पॅकेज title=

इंदूर : इंदूर हे व्यापाराच्या जगातील एक मोठं नाव... पण आता आणखी एक व्यापार वाढीला लागला आहे. त्या व्यापाराचं नाव आहे ई-सेक्स बाजार.... पण या सर्व गोष्टींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. 

अँड्रॉइड फोन अॅपपासून ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून शहरातील कॉर्लगर्ल उपलब्ध करण्याचा धंदा सुरू आहे. सेक्स माफियांनी इंटरनेटवर अनेक इंदूरच्या वेबसाइट सुरू केल्या आहे. यात सेक्सचा बाजार भरला आहे. 

असा होतो सौदा 
मुलीचा फोटो सिलेक्ट केल्यावर साइटवर लिहिलेल्या नंबरवर कॉल केल्यास व्हॉट्सअॅपवर काही वेळात फोटो पाठविण्यात येतात. फोटोतील मुली १८ ते ३० वर्षांच्या आतील असतात. 
सौदा फिक्स झाल्यावर माफिया कस्टमरला एखाद्या हॉटेलची रूम बुक करायला सांगतात. रूम बुक झाल्यावर ती सेलेक्टेड मुलगी त्या हॉटेलवर पाठविण्यात येते.

पॉश भागात बनला अड्डा 
कस्टमरने सांगितलेल्या ठिकाणी मुली पुरविल्या जातातच पण शहरातील काही पॉश भागात काही फ्लॅटसुद्धा माफियांकडून घेण्यात आले आहेत. माफिया कस्टमरला एक व्यक्ती ठिकाणी नेऊन सोडतो.

बाहेरील व्यक्ती टार्गेट
इंदूर ही मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने व्यापाराच्या निमित्ताने लोक येथे येतात. अशा लोकांना टार्गेट करण्याचे काम हे सेक्स माफिया करतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.