एमआयएमची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मागे

राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी एमआयएमची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेतला गेला आहे.

Updated: Aug 9, 2016, 03:08 PM IST
एमआयएमची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मागे title=

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी एमआयएमची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेतला गेला आहे.

आयकर विवरण पत्र आणि लेखा परीक्षण सादर न करणाऱ्या 197 पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने केली होती रद्द. एमआयएमसह सहा पक्षांनी एक लाख रुपये दंड भरून कागदपत्रे सादर करण्यास मागितली मुदतवाढ मागितली होती. मुदतवाढ देताना निवडणूक आयोगाने सहा पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. - एमआयएमसह सहा पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे.