हैदराबाद : तुम्ही पीएफधारक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पीएफधारक कामगारांना स्वस्त दरात घरे देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिलीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2022पर्यंत देशातील प्रत्येकाला घर उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा लोकसभा निवडणुकीदरम्यान केली होती. ही घोषणा पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे बंडारु म्हणाले.
पीएफमध्ये कामगारांचा सहभाव वाढवण्याच्या दृष्टीने ही योजना सुरु केली जातेय. सध्या आणि भविष्यात जितका निधी पीएफ खात्यात जमा होईल. त्या निधीतून घर देण्यात येणार असल्याचे बंडारू म्हणाले.
कामगारांचा आधारक्रमांक पीएफ खात्याशी जोडला जातोय. आतापर्यंत ७ कोटी ४४ लाख खाती आधार ओळखपत्राशी जोडण्यात आलीयेत.