मुंबई : भारतात प्रत्येक दिवशी बलात्काराचे 92 गुन्हे दाखल होतात.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत एक लाख महिलांमागे बलात्कार होण्याची संख्या सर्वात जास्त आहे.
ब्युराने दिलेल्या आकड्यांनुसार 2013 मध्ये एक लाख महिलांमागे 1 हजार 636 महिलांना कथित बलात्काराचा सामना करावा लागला.
दिल्ली नंबर एक
दिल्लीत 87 लाख 80 हजार महिला आहेत, या हिशेबाने दिल्लीतील बलात्कार प्रकरणांचा दर 18.63 आहे.
संपूर्ण भारतात 2013 साली एकूण 33 हजार 707 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले, यातील दिल्लीतील बलात्काराच्या गुन्ह्याचं प्रमाण 4.85 टक्के होतं.
हे आकडे पोलिस स्टेशनमधील आकड्यांवरून घेण्यात आले आहेत. भारतात बलात्काराची प्रकरणं पोलिस स्टेशनपर्यंत पोहचत नाहीत.
मिझोरम आणि सिक्कीम
राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यांवरून, एक लाख महिलांमागे कथित बलात्कार होण्याचं प्रमाण दिल्लीत सर्वात जास्त आहे.
दिल्ली नंबरवन आहे, तर मिझोरमचा नंबर दुसरा आहे. मिझोरममध्ये बलात्कार प्रकरणांचा दर 17.8 टक्के आहे.
मिझोरममध्ये महिलांची संख्या फक्त पाच लाखपर्यंत आहे. देशात बलात्कार प्रकरणांत सिक्कीमचा तिसरा क्रमांक आहे.
सिक्कीममध्ये एक लाख महिलांमागे बलात्कार प्रकरणांचा दर 14.58 आहे. मिझोरममध्येही महिलांची संख्या 2 लाख 95 हजार आहे.
मध्य प्रदेश सावरलं
मध्य प्रदेशात काही वर्षापासून बलात्कार प्रकरणाचं प्रमाण वाढतं होतं. मात्र या वर्षी सर्वात जास्त, 4 हजार 335 प्रकरणं दाखल झाली आहेत.
मात्र एक लाख महिलांमागे हा दर कमी आहे. मध्य प्रदेशात हा दर 12.11 आहे. मध्य प्रदेशात 3 कोटी 58 लाख महिला आहेत.
मागील वर्षी
ब्युरोने मागील वर्षी 2012 मध्ये नोंदवलेल्या आकड्यांची कहाणी जरा वेगळी आहे.
यानुसार एक वर्ष आधी एक लाख महिलांमागे सर्वात जास्त बलात्काराचं प्रमाण हे मिझोरममध्ये होतं. हे प्रमाण लागामागे 20.81 तर राजधानी दिल्लीत 8.26 होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.