वडिलांच्या खूनाचा बदला घेतला १२ वर्षांनी, केले १२ तुकडे

लहान असताना आपल्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांचा बदला मुलाने १२ वर्षांनी घेतला. त्याचे नाव आहे आलम खान. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.

PTI | Updated: Dec 22, 2015, 05:18 PM IST

लखनऊ : लहान असताना आपल्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांचा बदला मुलाने १२ वर्षांनी घेतला. त्याचे नाव आहे आलम खान. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.

तो १२ वर्षांचा असताना वडिलांना ठार करण्यात आले होते. ही घटना त्याने पाहिली होती. मात्र, त्याने याबाबत कोणाला सांगितले नाही. आपल्या मनात राग कायम ठेवून तब्बल १२ वर्षानंतर वडिलांचा बदला घेतला.

वडिलांचा मित्र मोहम्मद रईसने याने आलमच्य वडिलांचा खून केला होता. ही घटना त्याच्या डोळ्यादेखत झाली होती. मात्र, तो याबाबत गप्प होता. त्याने १२ वर्षानंतर वडिलांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचला आणि आलमने प्रत्यक्षात आणला.

आलमने रईस आपल्या घरी मद्यपानासाठी निमंत्रण दिले. रईसला मद्य जास्त झाल्याने तो नशेत असताना आलमने चाकू भोसकून त्याचा खून केला. त्यानंतर रईसच्या शरीराचे १२ तुकडे केले. वडिलांच्या खुनाला १२ वर्षे उलटून गेल्यामुळे प्रत्येक वर्षासाठी एक अशा रितीने त्याने शरीराचे १२ तुकडे केले आणि एका साथीदाराच्या मदतीने ते तुकडे प्लॅस्टिक बॅग्समध्ये कोंबून ते एका नदीत फेकून दिलेत.

नदी किनारी बॅगमध्ये मृतदेह असल्याची बाब पोलिसांना समजली. त्यानंतर अधिक तपास केल्यानंतर शरीरावरील शस्त्रक्रियांच्या खुणांमुळे पोलिसांनी तो मृतदेह रईसचा असल्याचे ओळखले. मृत्युपूर्वी अनेकांनी रईसला शेवटचे आलमच्या घरी जाताना पाहिले होते. त्यावरुन पोलिसांनी छडा लावला.

दरम्यान, चौकशीच्यावेली आमलच्या बोलण्यातून आपल्या कृत्याचा जराही पश्चाताप झाल्याचे दिसत नव्हते. उलट आपला प्लॅन खरोखरच पूर्ण झाल्यामुळे तो आनंदी होता, असे पोलिसांनी सांगितले. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x