व्हॉट्सअॅपवरच्या वादाने त्याचा जीव घेतला

लुधियाना : व्हॉट्सअॅपवरुन सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे पंजाबच्या लुधियानात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

Updated: Feb 1, 2016, 04:27 PM IST
व्हॉट्सअॅपवरच्या वादाने त्याचा जीव घेतला title=

लुधियाना : व्हॉट्सअॅपवरुन सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे पंजाबच्या लुधियानात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दविंदर सिंग असं या मुलाचे नाव आहे.

दविंदर आणि त्याच्या शाळेतल्या मित्रांनी व्हॉट्सअॅपवर मित्रांचा एक ग्रुप सुरू केला होता. ग्रुपमध्ये चॅटिंग करताना गुग्गू आणि हिमांशू या मित्रांदरम्यान काही कारणांवरुन वाद झाला. दोघांनीही एकमेकांना बघून घेऊ अशी धमकी दिली. दरम्यान दविंदर या हिमांशूच्या मित्राने त्यांच्यातील हा वाद व्हॉट्सअॅपवरच थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही.

 

यानंतर हिमांशू भेटायला गेला नाही, तेव्हा गुग्गूने हिमांशूला घाबरला म्हणून डिवचले. यानंतर हिमांशूचे मित्र आणि गुग्गूचे मित्र दुपारी मैदानात भेटले. त्यांच्यात हाणामारीला सुरुवात झाली. ही हाणामारी थांबवण्याचा दविंदरने प्रयत्न केला. पण, हे करतानाच गुग्गूच्या एका साथीदाराने दविंदरवर हल्ला केला. या हल्ल्यात दविंदरचा बळी गेला.

यानंतर ही मुले मैदानातून पळून गेली. पोलिसांना या घटनेची खबर मिळताच ते घटनास्थळी पसरले आणि मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.