काश्मीरची संचारबंदी उठली, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

काश्मीर खोरं सुमारे अडिच महिन्याहून अधिक काळ धुमसत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.

Updated: Sep 25, 2016, 11:18 PM IST
काश्मीरची संचारबंदी उठली, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

श्रीनगर : काश्मीर खोरं सुमारे अडिच महिन्याहून अधिक काळ धुमसत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता संचारबंदी उठवल्यानंतर काश्मीरमधल्या रस्त्यांवर घोंघावणारे अशांततेचे वारे मावळल्याचं पाहायला मिळालं.

रविवारी श्रीनगरमध्ये त्याचाच प्रत्यय पाहायला मिळाला. संचारबंदी उठल्यामुळे, श्रीनगरमधल्या नागरिकांनी दुकानांत खरेदीसाठी गर्दी केली होती. तर रस्त्यांवर वाहनांची वर्दळ आणि माणसांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे नागरिकांना शांती हवी असल्याचंच यातून दिसून आलं.