नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत...
1. भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी झाली हे पाकिस्तान कधीही मान्य करणार नाहीत कारण पाकिस्तान भारतीय सैन्याचं यश कधीही मान्य करू शकणार नाही.
2. भारतीय सैन्याचं यश मान्य करणं म्हणजे पाकिस्तानी आर्मीचं अपयश मान्य करणं... ते पाकिस्तान सरकारला परवडणारं नाहीय.
3. भारतानं पाक हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळं उद्ध्वस्त केले असं पाकिस्ताननं मान्य केलं तर त्याचाच अर्थ असेल की पाकिस्तान दहशतवाद्यांना थारा देतं... आणि प्रोत्साहनही!
4. उरी हल्ला करून पाकिस्ताननं जागतिक पातळीवर स्वत:ची नाचक्की करून घेतलीय. भारताचं यश मान्य करून आता आपल्याच देशातील सुजाण नागरिकांना तोंडही दाखवायला पाकिस्तानला लाज वाटेल.
5. भारतीय सैन्याच्या ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही हे पाकिस्तान आर्मीला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे ही गोष्ट स्वीकारून पाकिस्तान उघड उघडपणे युद्ध पुकारण्याची चूक करणार नाही.
त्यामुळेच पाकिस्तानमध्ये भारताची 'सर्जिकल स्ट्राईक' कशी स्वीकारायची यावर दुफळी माजलीय. भारताच्या सर्जिकल स्ट्राइक कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एलओसी क्रॉस केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्यांना तसेच उत्तर देण्यात येईल, अशी उलटीबोंब मारली आहे. तर भारताने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सर्जिकल स्ट्राइक म्हणण्यास तयार नाही. दरम्यान, पाकिस्तानने आमचे केवळ दोन जवान मारले असल्याचे म्हटले आहे. तर 9 जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी याबाबत माहिती दिली.